विलास लाटे/पैठण : केंद्र स्तरावर काम करणारा केंद्रीय पत्रकार संघ अर्थात सीपीजेएच्या पैठण तालुका ग्रामीण विभागाच्या अध्यक्षपदी अफसर शेख यांची नियुक्ती करण्यात आली तसेच पैठण तालुका अध्यक्ष आप्पासाहेब भावले, उपाध्यक्ष सोमनाथ तवार व मुनावर शेख यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय प्रभारी कमलेश गायकवाड यांच्या संमतीने राज्याचे कार्याध्यक्ष विनायक कांगणे, राज्य सचिव राजीव दळवी व औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष फिरोज शेख यांनी नियुक्ती जाहीर केली. यावेळी ग्रामीण वार्ताहर यासाठी पत्रकारिता मार्गदर्शन शिबिरे यावर विशेष काम करण्याचे अफसर शेख यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व मित्रमंडळी, शैक्षणिक आदी क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या