अहमदनगर/ जावेद शेख : कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे झालेल्या विटंबनेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी आज नगर जिल्हा मराठा महासंघाचे वतीने राहुरीचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन दोषी समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले, संयुक्त सरचिटणीस रमेश बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र काळे, राहुरी तालुकाध्यक्ष अतुल तनपुरे, शहराध्यक्ष प्रदीप भुजाडी, संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, मराठा एकीकरण समितीचे अनिलराव इंगळे, युवक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुदेश बोरुडे, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेशराव निमसे, गणेश वराळे, सचिन शिरसाठ, कुलदीप वराळे, मच्छिंद्र लांडे, किशोर वराळे, हर्षल शेटे, रोहीदास धनवडे आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
0 टिप्पण्या