हरिगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक ३ जागांपैकी २ बिनविरोध शक्यता

श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेल्या हरिगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून त्यात कोणते उमेदवार बाजी मारतात त्याकडे हरिगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

श्रीरामपूर तालुक्यात एकूण ३१ ग्रामपंचायत सदस्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी त्यांना अपात्र ठरविले. त्यापैकी हरिगाव ग्रामपंचायत येथील माजी सरपंच अस्मिता नवगिरे, उषा कांबळे व सागर सोनवणे असे तीन सदस्य अपात्र ठरले. त्या ३ जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच उन्दिरगाव ग्रामपंचायत प्रभाग ६ मधील सर्वसाधारण ग्रा.प.सदस्य या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून विस्तार अधिकारी पी बी पावसे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दि ७/१२/२१ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी झाली आहे. अर्ज माघार घेण्याची दि ९ डिसेंबर आहे व व २१ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येईल.

उंदीरगाव प्रभाग ६ साठी पाउलबुद्धे, ससाणे गटाचे विलास इंद्रभान भालदंड व गलांडे-मुरकुटे गटाचे अशोक रेवजी भालदंड यांचे अर्ज दाखल आहेत. ग्रामपंचायत हरिगाव प्रभाग ३ अनु. जाती पुरुष जागा एक, अनुसूचित जाती स्त्री एक जागा, प्रभाग ५ मध्ये अनु.जमाती पुरुष एक या ३ जागेसाठी निवडणूक जाहीर आहे. पोटनिवडणूकीसाठी मा.आ. मुरकुटे व ससाणे गट एकत्र येऊन निवडणूक लढविली जाणार आहे. प्रभाग ३ मधून युतीचे उमेदवार म्हणून अनु.जाती पुरुष मधून दीपक भाऊराव नवगिरे यांनी अर्ज दाखल केला. प्रभाग ३ मध्ये अनु जाती स्त्री उमेदवार उषा नारायण कांबळे व प्रभाग ५ मध्ये अनु.जाती पुरुष या एक जागेसाठी सचिन विठ्ठल गांगुर्डे यानी अर्ज दाखल केले. इतर कोणाचा अर्ज दाखल नसल्याने उषा कांबळे व सचिन गांगुर्डे ह्या दोन्ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. प्रभाग ३ मध्ये दीपक नवगिरे व दिलीप त्रिभुवन यांनी अर्ज दाखल केल्यामुळे फक्त एक जागेसाठी निवडणूक लढत होण्याची चिन्हे दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दि ९ डिसेंबर असल्याने कोण माघार घेतो व निवडणूक बिनविरोध होते की काय याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी दोन्ही उमेदवार ग्रा.प.सदस्य व सरपंचपद भोगलेले आहे. ही निवडणुक लोकनेते भानुदास मुरकुटे, उपनगराध्यक्ष करण ससाणे याच्या नेतृत्वाखाली होत आहे व ती यशस्वी होण्यासाठी सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, सुरेश पा.गलांडे, राजेंद्र पाउलबुद्धे, विठ्ठल सोमोसे, किरण खाजेकर, रसूल पठाण, सुनील शिणगारे, रमेश भालेराव, तुकाराम गाडेकर, चंद्रकांत चाबुकस्वार, बबन खरात, अमोल नाईक, विशाल गायकवाड, जगन शरणागते, संतोष बनसोडे, अशोक गडवे आदी प्रयत्नशील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या