विलास लाटे/पैठण : राज्यातील ओबीसी समाजाला न्यायालयाने असलेले राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजाची संख्या आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे तालुक्यातील ओबीसी समाज एकवटला असून यासाठी पैठण तालुक्यातील ओबीसी समाजाची आज पैठण येथील शिवेश्वर धर्मशाळा येथे बैठक संपन्न झाली बैठकीत तालुक्यातील पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पैठण तालुका ओबीसी आरक्षण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून दि.२४ शुक्रवार रोजी बैठक संपन्न होणार असून या बैठकीला तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .
पैठण येथे आज शिश्वेश्वर धर्मशाळा येथे पैठण तालुक्यातील ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळी अकरा वाजता बैठक संपन्न झाली .या वेळी पैठण तालुक्यांमध्ये ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी तालुका ओबीसी आरक्षण संघर्ष समितीची माध्यमातून येणाऱ्या काळात पैठण तालुक्यात ओबीसी समाज एकत्र करण्यासाठी नवीन दिशा आखण्यासाठी सर्वानुमते दि .२४ शुक्रवार रोजी विश्वेश्वर धर्मशाळा येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
झालेल्या बैठकीला आप्पासाहेब सोलाट, चंद्रशेखर सरोदे, अरूण घोडके, बंडू महाराज गाढे, दादासाहेब गलांडे ,योगेश सोलाटे, दिगंबर सोनवणे, विजय गायकवाड, जगदीश वीर, गोपाल धारे ,दत्ता नेमाने, दादासाहेब गलांडे ,जगदीश वीर, विकास नाचन ,मोहन जानकर, महादेव ठोके, अमोल तुपे ,विष्णू शेजुळ ,दत्तात्रेय सोरमारे, विजय ठाणगे, वसंत चोरमले, ज्ञानेश्वर जाधव , राजू पाचे, अमोल वीर, अशोक सरगर ,सोमनाथ नजन,पंकज गायकवाड , अजय भालेकर, शिवाजी तुपे, दामोदर गांगले, भाऊसाहेब देशमुख सह आदी ओबीसी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या