श्रीगोंदा / सुभाष दरेकर : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन दि. १ जानेवारी २०२२ रोजी सोडण्याचा निर्णय झाला असल्याने कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य घनःशाम शेलार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
दि. २३ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन कुकडी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेलार यांनी केली होती. दि. ४ डिसेंबर रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील सिंचन भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य घन: शाम शेलार यांनी दिली आहे.
या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह आ. रोहित पवार, आ. अशोक पवार, आ. अतुल बेनके, आ. संजय शिंदे, घन:शाम शेलार यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य व कुकडी प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता, सर्व अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या