जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम

अहमदनगर/ जावेद शेख - अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ उद्या, २९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तसेच ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अशी माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले व अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमासाठी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महापौर सौ. रोहिणी शेंडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्री घुले पाटील, शिर्डी श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आ. आशुतोष काळे, खा. सदाशिवराव लोखंडे, खा. सुजय विखे-पाटील, तसेच जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद चे सर्व सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या