माहेगाव येथे ऊसाच्या शेताला आग लागून नुकसान; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

आरडगांव/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे शेतातील पाचरट पेटवून दिले असता ती आग पसरत जाऊन पुंजाहरी मुंगसे यांच्या उसाच्या शेताला लागली. यावेळी मुंगसे यांचा दिड एकर ऊस जळून खाक झालाय. त्यामुळे त्यांचे लाखों रूपयांचे नूकसान झाल्याची घटना घडली. याबाबत राहुरी पोलिसांत धोंडीराम बोंबले याच्या विरोधात मंगळवार 7 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

माहेगाव शिवारातील पुंजाहरी मुंगसे यांचे शेत गट नं. २४२ येथे ऊसाने क्षेत्र आहे. त्यांच्या शेजारी आरोपी धोंडीराम बोंबले याचे शेत आहे. दिनांक ६ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजे दरम्यान धोंडीराम बोंबले यांनी त्यांच्या शेतातील पाचरट निष्काळजी पणाने पेटवून दिले. ती आग पसरत जाऊन पुंजाहरी मुंगसे यांच्या ऊसा पर्यंत पोहचली. या घटनेत पुंजाहरी मुंगसे यांचा दिड एकर ऊस जळून खाक झालाय. त्यामध्ये त्यांचे लाखों रूपयांचे नूकसान झाले आहे, असे पुंजाहरी मुंगसे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पुंजाहरी मारूती मुंगसे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी धोंडीराम तुकाराम बोंबले राहणार माहेगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या