अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तहसिल कार्यालयाच्या वतीने श्री गाडगे बाबा आश्रम शाळा राहुरी येथे अहमदनगर जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख, जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब भालेराव, जगदाळे, पेरणे, सौ.ओहळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डाॅ. सौ. कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब भालेराव, महावितरणचे गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वराज पोलीस मिञ पञकार संरक्षण समिती व माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन दिघे, जिल्हा सचिव डाॅ देवेंद्र शिंदे, राहुरी तालुका प्रसिद्धी प्रमुख दत्ता जोगदंड, नानाजी जोशी आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या