हरिगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदान शांततेत

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : तालुक्यातील ग्रामपंचायत हरिगाव येथे झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. ३ जागेपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या. एका जागेसाठी ए ब्लोक, महाजन वाडी प्रभाग ३ मध्ये एकूण मतदार ४४४ पैकी २४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान ५४ टक्के झाले असून शांततेत पार पडले.

शेती महामंडळ मधील बरेचसे कामगार स्वेच्छा निवृत्तीमुळे हा प्रभाग सोडून शहराकडे व इतर गावाकडे गेल्याने मतदार संख्या घटली आहे. पोटनिवडणूक साठी दीपक नवगिरे व दिलीप त्रिभुवन यांच्यात सरळ लढत झाली. मतमोजणी दि.२३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या