जिद्दी-कष्ट-आणि श्रद्धेला फळ- करपे इंडियन आर्मीत

अहमदनगर/ जावेद शेख : टाकळीमिया गावातील अनेक तरुण आर्मी, पोलीस, तसेच विविध प्रकारच्या भर्ती साठी रात्र अन दिवस परिश्रम करताना दिसतात. पण प्रत्येकालाच यश येईल असं नाही. आर्मी को जिगर लगता है...आणि ती जिगर आम्ही ठेवणार असे म्हणत दादा करपे आपल्या जिद्दीवर अपार कष्टाने इंडियन आर्मीत जाण्याचे स्वप्न करून दाखवले.

दादा करपे यांची परिस्थिती मध्यमवर्गीय पण अपार कष्ट व संयम याची जोड दादा यांच्याकडे होतीच, आपल्या सर्व मित्र परिवार जमा करून मित्रांसाठी भर्तीसाठी ट्रेनिंग अकादमी चालू केली. त्यास सेल्फ अकॅडमी नाव देऊन कोणतीही फी न घेता प्रत्येकाकडे बारीक लक्ष ठेवले व जी जी अडचण येईल तिथे दादा करपे व त्यांची मित्र मंडळी उभी राहिली. अतिशय गरीब परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून मिळेल ते काम करून अभ्यास व मैदानी परिश्रम घेतले. भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र करपे ( राघू मामा) यांची इच्छा होती की देश सेवेसाठी दादा यांनी प्रयत्न करावे. तसेच त्यांची कन्या कल्याणी करपे पोलीस मध्ये भर्ती व्हावे यासाठी अपार कष्ट घेत या दोघा भावंडांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

आज मुलगा इंडियन आर्मी व कन्या पोलीस मध्ये कार्यरत आहे. आज खरे समाधान राजेंद्र करपे यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. आज ही जुने दिवस आठवले की त्यांचे डोळे ओलावतात, मुलांनी कष्ट करून त्यांचे भविष्य उज्वल केले हे सांगताना ते गहिवरून आलेले दिसतात. अनेक तरूणांना आजही काही अडचण आली की दादा करपे हे धावून येतात, टाकळीमिया येथे होतकरू स्वावलंबी तरुणांच्या सेल्फ करियर अकॅडमी कडे पूर्ण लक्ष ठेवून असलेले दादा यांची इच्छा आहे की गावातील व आपल्या परिसरातील तरुणांनी आर्मी मध्ये आले पाहिजे त्यासाठी मी नक्की त्यांना प्रोहोत्सन देईल, नुकतीच दादा करपे हे आपली ट्रेंनिग मराठा इन्फंट्री बेळगाव मराठा बटालियन येथे पूर्ण झाली आहे आता सुट्टी नंतर दादा करपे यांची देशसेवेची ड्युटी दिल्ली येथे असणार असून सुट्टीनंतर ते दिल्लीला रवाना होणार आहे. आज टाकलिमिया गावचे ग्रामदैवत मियासाहेब बाबांना चादर वाहून ग्रामदैवताचे दर्शन घेण्यात आले. गावाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील देशसेवेच्या वाटचालीसाठी व देशाचे संरक्षण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उपस्थित डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शामकाका निमसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश करपे, सरपंच सुभाष जुंदरे, राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानदेव निमसे, गोरख आबा शिंदे, पंडित सर, जुंदरे सर, भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र करपे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संयोजक संदीप विधाटे, पत्रकार अक्षय करपे, राजू काका आढाव, दिगंबर करपे, अजित करपे, सतीश सगळगिळे, मनोज बेलदार, अथर्व राजळे, दीपक बनकर, साहिल सगळगिळे, राहुल कदम, दीपक मुसळे, बालू कदम आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या