• आ.विखे यांना कार्यक्रमाला बोलावून डोकेदुखी ठरली
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेच्या भूमिगत गटारीच्या शुभारंभासाठी आ.राधाकृष्ण विखे हे आले असताना त्यांनी देवळाली प्रवरातील भाजप विरोधी कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आगामी निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असल्याचे समजते. त्यामुळे विखे समर्थक पालिका निवडणुकीत नगरपालिका कोणता पवित्रा घेणार याबाबत उलट सुलट चर्चा चालू झाली आहे. आमदार विखे यांना कार्यक्रमाला बोलवून भाजपाची डोकेदुखी ठरली आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या भूमिगत गटारीच्या विकास कामाचा शुभारंभ राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला. भूमिपूजनाच्या कार्यक्रमापूर्वी आमदार विखे यांनी राहुरी फॅक्टरी येथील गणेश भांड यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन भाजप विरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ( विखे समर्थक असलेल्या ) बैठक घेऊन आगामी निवडणुकीबाबत सखोल चर्चा करण्यात आली असल्याचे समजते. नगरपालिका निवडणुकीत भाजपा विरोधात स्वतंत्र विखे गट निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. असे कार्यकर्त्यांनी आमदार विखे यांना सांगितले.
त्या संदर्भात चर्चा केली. कार्यकर्त्याच्या भावना आमदार विखे यांनी जाणून घेतल्या. नगर पालिका निवडणुक जाहिर होईल त्यावेळी निर्णय घेण्यात येईल, असे विखे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले असल्याचे समजते. भाजपाने नगरपालिका निवडणुकीत स्वतःची ताकद वाढवण्यासाठी विखेंचा आधार घेतला आहे. परंतू कार्यक्रम नगरपालिकेच्या सत्ताधारी मंडळाचा असला तरी विखे यांनी मात्र विखे समर्थक (भाजपा विरोधी) कार्यकर्त्यांची भेट घेऊन नंतर नगरपालिकेच्या कार्यक्रमास जाणे पसंद केले. यावरून आमदार विखे यांनी भाजपा विरोधी कार्यकर्त्यांच्या बैठकीला पहिली पसंती दिली आहे. सत्ताधारी भाजप गटाला आमदार विखे यांना बोलावून भाजपची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे भाजपाचे कार्यकत्यांनी नाराजीचा व्यक्त केली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील गणेश भांड यांच्या संपर्क कार्यालयात आमदार विखे यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. विखे समर्थक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली आहे. त्यापूर्वीच आमदार विखे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सत्ताधारी भाजप गटा विरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकीसंदर्भात येत्या दोन दिवसानंतर लोणी येथे स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे विखे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. लोणी येथील बैठकीत नगरपालिका निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घ्यायचा तो सर्वानुमते घेण्यात येईल, असे आ.विखे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
नगरपालिका निवडणुका स्वतंञ लढवणार का असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे. देवळाली प्रवरातील सत्ताधारी भाजप गटाला विखे समर्थक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. आमदार विखे नगरपालिका निवडणुकीत भाजपला मदत करणार की विखे समर्थक कार्यकर्त्यांना मदत करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बैठकीला गणेश भांड, दीपक त्रिभुवन, सुरेंद्र थोरात, दासु पठारे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीत विखे समर्थक स्वतंत्र गट निवडणुकीत उतरावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असल्याचे समजते.
0 टिप्पण्या