अहमदनगर/ जावेद शेख : एक महिन्यापासून समाज मंदिर डागडुजी आणि सुशोभीकरण काम बहुजन विकास कृती समिती, वरवंडी तर्फे हाती घेण्यात आले होते. त्यानुसार समाजमंदिर सुशोभीकरण पूर्ण करून 6 डिसेंबर चे औचित्य साधून आज रोजी भारतरत्न, विश्वभूषण, महामानव, क्रांतिसूर्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त समाज मंदिर येथे अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने समाज मंदिर सामाजिक कार्यक्रमासाठी खुले करण्यात आले आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
समाज मंदिर हे बहुजन समाजाच्या विकासाचे केंद्र बनावे या हेतूने दर रविवारी सकाळी एकत्र जमून त्रिशरण, पंचशील व इतर विधी करणे, गौतम बुद्ध आणि फुले शाहू आंबेडकर या महामानवांचे बाबत असलेले साहित्य वाचन करणे, धार्मिक व सामाजिक विषयांवर चर्चा परिसंवाद घडवून आणणे व इतर सामाजिक बांधीलकी चे कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी संजय संसारे यांनी पुस्तके उपलब्ध करून देणे आणि मार्गदर्शन करणे बाबत दर रविवारी वेळ देण्याचे घोषित केले. सलिमभाई शेख यांनी समाज मंदिर मध्ये अंथरण्यासाठी चटई देण्याचे घोषित केले. तसेच दिंगबर ताकटे पाटील यांनी सुशोभीकरणासाठी 500 रु दिले. 12 डिसेंबर 2021 पासून दर रविवारी नियमित सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेण्याचे निश्चित करून सर्व कार्यकर्त्यांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले. यानंतर सुनील भालेराव, रविंद्र भालेराव व भालेराव कुटुंबियांकडून ग्रामपंचायत कार्यालय वरवंडी यांना भारतीय संविधान उद्देशिका भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी सलीम शेख, जगदीश भालेराव, भाऊसाहेब कोळेकर, दिंगबर ताकटे, राजु पवार, रविंद्र भालेराव, गोरक्षनाथ भालेराव, कैलास पवार, रमेश जाधव, दगडु बर्डे, सुनिल भालेराव, सुनिल पवार, आबा भालेराव, सुहास भालेराव, बंटी भालेराव, जालिंदर अडसुरे, सिरपत पवार, सलमान शेख आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या