कापुस उत्पादक शेतकऱ्याचा बियाणे कंपनीकडून सत्कार

राहुरी : तालुक्यातील शिलेगाव येथील प्रगतशील शेतकरी अनिल बाळासाहेब म्हसे यांनी रासी हायब्रीड ६५९ जातीच्या कापुस बियाण्यापासुन १८ क्विंटल उत्पादन घेतल्याने त्यांचा रासी बियाणे कंपनी कडुन सत्कार करण्यात आला आहे.

कापुस उत्पादक शेतकरी अनिल म्हसे यांनी अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादनात घट आली असतानाही चांगले उत्पन्न घेतल्याबद्दल रासी बियाणे कंपनीचे प्रोजेक्ट ऑफिसर तुषार साळवे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कंपनीकडून भेट म्हणून घड्याळ देण्यात आले.

या प्रसंगी मधुकर म्हसे, संदीप उंडे, बाळासाहेब म्हसे, अमोल म्हसे, सागर म्हसे, मधुकर आढाव, महेश साईराम म्हसे,  मारूती म्हसे, गणेश म्हसे, सार्थक म्हसे, अनुज उंडे, रामभाऊ म्हसे, शिवाजी बर्डे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या