सोनगांव अनापवाडी ग्रामस्थांनी मानले ना. तनपुरेंचे आभार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे प्रदेश चिटणीस मिलींद अनाप यांच्या पाठपुराव्याला आले यश...


राहुरी शहर/अशोक मंडलिक : सोनगांव अनापवाडी येथील गावठाण परिसरात एकच डिपी आहे. त्या डिपी (ट्रान्सफर्मर) वरून अनापवाडी येथील घरगुती कनेक्शन एकाच फेज वर होते. त्यामुळे वारंवार डिपी फेल होणे फ्युज, केबल जळणे असे प्रकार घडत होते. या कारणाने अनापवाडी येथील ग्रामस्थ त्रस्त झाले होते.

मागील महिन्यात सोनगांव येथे झालेल्या जनता दरबारात हा प्रश्न मिलींद अनाप यांनी ना. प्राजक्त तनपुरे यांना सांगितला. ना. तनपुरेंनी त्याक्षणी त्यांचे उर्जा विभागाचे स्विय्य सहाय्यक सोमनाथ अनाप यांना व सात्रळ सबस्टेशन चे टेकाळे यांना आदेश दिले व हा प्रश्न लगेच मार्गी लावला. त्यानंतर मिलींद अनाप यांनी याचा पाठपुरावा करून हे एकुण १४ गाळे डबल कन्डक्टर टाकुन घेतल्यामुळे या परीसरातील लोकांचा घरगुती लाईट चा प्रश्न सुटला आहे. हे काम पुर्ण झाल्यामुळे अनापवाडी परीसरातुन ना. तनपुरे यांचे सर्व ग्रामस्थाांच्या वतीने आभार मानले आहेत. याकामी सूर्यभान शिंदे, नरेेंद्र अनाप, भारत अनाप, किशोर अनाप, रोहीत असावा, विजय शिंदे, राहुल अंत्रे यांचे हि सहकार्य लाभले आहे.

या व इतरही कामामुळे ना. तनपुरे यांची सोनगांव व पचंक्रोशीतील युवकांच्या व ग्रामस्थांच्या मनात तनपुरे यांच्याविषयी चा आदर आजुनच वाढत आहे. कारण गेल्या २५ ते ३० वर्ष पासुन या भागाचा खुटलेला विकास आता होताना दिसत आहे. त्यामुळे मतदानाच्या वेळी दिलेले तनपुरे यांचे अश्वासने पुर्ण होणार यांत आता ग्रामस्थांच्या मनात कुठलीच शंका नाही असेही लोक बोलत आहेत. प्रत्येक काम मिलींद अनाप व त्यांचे सर्व सहकारी स्वतः लक्ष घालुन बघतात यांचे ही ग्रामस्थांना कैतुक वाटत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या