चितेगाव सराफा व्यापारी कडून ग्राहकांची लूट


विलास लाटे /पैठण : पैठण तालुक्यातील चितेगावात सोने-चांदीचे दागिने खरेदीदार ग्राहकांकडून जी.एस.टी सहित सराफा व्यापारी पैसे वसूल करतात मात्र बिल विना जी.एस.टी.चे देऊन दिवसाढवळ्या शासनाच्या तिजोरीवर लाखोंचा दरोडा टाकतात. 

शासनाने वस्तू सेवा खरेदी-विक्रीवर जी.एस.टी कर प्रणाली लागू केली असल्यामुळे देणारा आणि घेणारा खरेदी-विक्री करताना जी‌एस.टी प्राणाली मधूनच व्यवहार करावा लागतो.परंतु चितेगाव सराफा व्यावसायिक ग्राहकांकडून जी.एस.टी सहित वस्तूचे पैसे घेतात. मात्र कच्चे बिल देतात त्यावर जी.एस.टी नंबर चा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्यां ग्राहकांना विनाकारण जी.एस.टी.चा फटका सहन करावा लागत आहे. या गलथान कारभाराकडे वस्तू सेवा कर आयुक्त यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून विना जी.एस.टी नंबरची बिले अदा करणाऱ्या सराफा व्यापारावर धडक कारवाई करण्याची मागणी गावातील व परिसरातील नागरिक व ग्राहकांनी केली आहे.

औद्योगिक वसाहत असल्यामुळे चितेगाव शहरात कामगार वर्गाची संख्या जास्त आहे बऱ्याच वर्षापासून सराफा व्यापारी ग्राहकांना कच्चे बिल देऊन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारतात याकडे वस्तू व सेवा कर अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सराफा व्यापारांना कठोर शासन करायला पाहिजे.    

    -सुनील खराबे पाटील, प्रतिष्ठित नागरिक तथा पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या