सात्रळ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा आणि रांगोळी स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

राहुरी / बाळकृष्ण भोसले - तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणित दिन समारंभ प्रसंगी गणित विषयातील संकल्पनावर आधारित प्रश्नमंजुषा आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदरच्या स्पर्धेत बत्तीस विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व स्पर्धा परीक्षक म्हणून सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नाशिक येथील गणित विभागाचे प्रा. शरद कार्ले उपस्थित होते. प्रास्ताविक सात्रळ महाविद्यालयाच्या गणित विभागप्रमुख प्रा. अश्विनी साळुंके यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, प्रा. दीप्ती आगरकर, प्रा. स्वाती कडू, प्रा.छाया पवार उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना प्रा. कार्ले यांनी गणित विषयाचे दैनंदिन जीवनातील महत्व विषद करून विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. दिपक घोलप म्हणाले, महाविद्यालयाचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर गणित विषयाचीही आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. आज विविध क्षेत्रांमध्ये गणित विषय हा गरजेचा आहे.

उपक्रमाच्या आयोजनास महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य प्रा. दिनकर घाणे, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. निलेश कान्हे आणि सर्व सहकारी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. माधुरी जेजुरकर यांनी केले. आभार प्रा. लतिका पंडुरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या