हरिगाव येथे नाताळ महोत्सव उत्साहात; अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव येथे संत तेरेजा चर्च भक्तीस्थानात नाताळ सण मोठ्या भक्तिभावाने शासनाचे कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला.

चर्चमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारीओ, रिचर्ड, सचिन मुन्तोडे आदींनी सर्व भाविक, ग्रामस्थांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. २४ डिसेंबर रोजी रात्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मघट्केचे स्मरणार्थ पहिला मिस्सा अर्पण करण्यात आला. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे. इस्त्राईल देशात बेथलेहेम या गावात प्रभू येशूचा जन्म झाला. या दिवशी सणाला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. यावेळी ख्रिसमस वृक्ष सजावट केली जाते. नाताळदिनी चर्चमध्ये जन्मोत्सव असल्याने केक कापण्यात आला व भाविकांना देण्यात आला. प्रांगणात येशू जन्माचा देखावा, सजावट करण्यात आली होती. चर्चमध्ये व बाहेरून व मतमाउलीच्या डोंगरावर विद्युत रोषणाई, फुलांची सजवत करण्यात आली होती. या सणास सर्व धर्मीय भाविक यांची उपस्थिती होती.
हरिगाव येथील नाताळ सणाला सर्व भाविक, ग्रामस्थ यांना माजी आ. भानुदास मुरकुटे, श्रीरामपूर उपनगराध्यक्ष करण ससाणे, साई संस्थान विश्वस्त सचिन गुजर, राजेंद्र पाउलबुद्धे, मा. चेअरमन सुरेश गलांडे, सरपंच सुभाष बोधक, अशोक कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुनील शिनगारे, विठ्ठल सोमोसे, उपसरपंच रमेश गायके, लक्ष्मणराव सरोदे, नगरपालिका नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यावतीने नगरसेवक राजेंद्र पवार, मुख्तार शहा, अर्जुन आदिक, अविनाश पोहेकर, अल्त्मश पटेल, सोमनाथ गांगड आदींनी शुभेच्छा दिल्या व प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांचेक्डून सर्व मान्यवरांना केक वाटण्यात आला.

नाताळ सणानिमित्त कमालपूर, माळवाडगाव, बेलपिंपळगाव, भोकर, वडाळा महादेव, इतरत्र मिस्सा घेण्यात आली. ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्ष व पवित्र मरिया, देवमाता सोहळा, १ जानेवारी २०२२ रोजी नवीन वर्ष, २ जानेवारी प्रभूचे प्रकटीकरण असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या