शुक्रवारी या घटनेची पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यास माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक दिलीप चौरे, उपनिरीक्षक राहुल भदरगे, सहाय्यक फौजदार नामदेव कातडे, पोलीस नाईक गणेश खंडागळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहीरीतून बाहेर काढला व घटनास्थळी पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी पैठणच्या घाटी रुग्णालयात पाठविला होता. या घटनेला एक वेगळेच वळण मिळाले असुन शेंदूरवादा ता. गंगापुर जि. औरंगाबाद येथील तो वास्तव्यास असल्याचे पोलिसांच्या तपासांती सिद्ध झाले आहे. शेंदूरवादा येथील आशा प्रल्हाद म्हैसमाळे यांनी त्यांचा मुलगा अंकूश प्रल्हाद
म्हैसमाळे ( वय १६ वर्ष) याचे कुणीतरी अपहरण केल्याची २ नोव्हेंबर २०२१ रोजी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान तेंव्हापासून वाळूज पोलीस त्याचा व अपहरणकर्त्यांचा कसून शोध घेत होते. दरम्यान पैठण तालुक्यातील ढोरकीन शिवारात त्याचा विहीरीत कुजलेल्या अवस्थेत नुकताच मृतदेह सापडला. दरम्यान तो शेंदूरवादा येथील रहिवासी आसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या मृतदेहाचे पैठणच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन मृतदेह काल रविवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, बिट जमादार राजेश चव्हाण, कर्तारसिंग सिंघल यांच्यासह वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस संयुक्तपणे करत आहे.
0 टिप्पण्या