भूमी फाउंडेशनचा कोरोना वारियर्स हा प्रेरणादायी उपक्रम- डॉ.लोखंडे

वाघोली- सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री मा.अलकाताई कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण भागात आज समाजातील असणार्‍या मूलभूत प्रश्नांवर उत्कृष्टरीत्या काम करत आहे. भूमी फाऊंडेशनचे कार्य हे गरजवंतांसाठी लाखमोलाचे असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना उभारी मिळावी. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा उत्साह अधिक बळकट व्हावा यासाठी संस्थेचा कोरोना वारियर्स हा उपक्रम स्तुत्य स्वरूपाचा असून कौतुकास्पद आहे असे मत वाघोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कैलास पवार सर यांनी सांगितले की कोरोना च्या जागतिक महामारीत देशासाठी सर्व स्तरावरुन खूप चांगले काम झाले आहे तसेच आरोग्य विभागाने देखील खुप मोठ्या जबाबदारीने कोरोना योद्धा म्हणून काम केले आहे. याप्रसंगी डॉ.स्नेहल सनी खरात यांनी सांगितले की आरोग्य विभाग हा सदैव एकजुटीने काम करणारा विभाग असून रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा मानत सदैव कार्य करणारी ही एक शासकीय यंत्रणा आहे.

याप्रसंगी कोरोना वारियर्स प्राप्त आरोग्य कर्मचारी सिस्टर सुप्रिया पुरोहित यांनी देखील आनंद व्यक्त करत आज आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी हे उत्तम रित्या आप-आपली सेवा बजावत आहे, असे सांगून आभार व्यक्त केले. यावेळी अनेक आरोग्य कर्मचारी देखील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या