महावितरणाच्या साञळ सबस्टेशनला भाजपा ओबीसी युवा मोर्चा व राहुरी तालुका भाजपाच्या वतीने निवेदन देताना कार्यकर्ते...
सोनगाव : गेल्या तीन चार दिवसांपासून सोनगाव, सात्रळ, धानोरे, पाथरे पंचक्रोशीतील बंद असलेले शेतीपंपास विद्युत पुरवठा करणारे रोहित्र तात्काळ सुरु करावे अशा आशयाचे निवेदन खासदार डॉ सुजय विखे पाटील व शिवाजीराव कर्डिलेे यांच्या मार्गदर्शनाखाली व विखे पाटील कारखान्याचे व्हा चेअरमन विश्वासराव कडू पाटील यांच्या प्रेरणेने व भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंत्रे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाच्या साञळ सबस्टेशनचे उपअभियंता श्री टेकाळे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की सध्या शेतातील विहरीत पाणी असून देखिल शेतकरी ते पाणी शेतीसाठी वापरू शकत नाही. तसेच जनावरांना पिण्यास देऊ शकत नाही. मुक्या जनावरांना विहरीतून पाणी ओढून पिण्यास द्यावे लागते. शेती पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याना याचा नाहक त्रास होत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत आपल्या पंचक्रोशी परिसरात सर्वात जास्त रुग्ण सापडले व सर्वात जास्त मयतही झाले असून पूर्ण परिसर यात होरपळून निघालेला आहे. म्हणून शेतकरी बांधवाना कुठल्याही प्रकारे वेठीस धरू नये. महावितरणाने विज बिल भरले नाही म्हणून विद्युत रोहीत्र बंद केले आहेत. ते तात्काळ सुरु करावेत.
या प्रसंगी बोलताना श्री धनवट म्हणाले की, हे सुस्त शासन मुजोरीची भाषा बोलत आहे. वास्तविक पाहता आपल्या लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न मिटवण्याठी जनतेने निवडुन दिले आहे. किमान तालुक्यातील गावांवर तरी वसुलीचा जोर देणे टाळणे गरजेचे असताना तरीही शेतकऱ्याहो विज बिल भरा नाहीतर, डीपी (ट्रान्सफार्मर) सुरू करणार नाही. अशी बोली भाषा बोलणार्या शासन अन् प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच सोनगाव साञळ धानोरे चौकात इरिगेशन बंगला रोडच्या सुरवातीला असणारा धोकेदायक विजेचा पोल व सदर पोलचे ताण दुसर्या जागी हालवावे म्हणजे संभाव्य अपघात टाळता येईल. लवकरात लवकर बंद डिप्या (ट्रान्सफार्मर) सुरू केल्या नाहीतर भाजपा ओबीसी युवा मोर्चा व भाजपा राहुरी तालुका अघाडीच्या वतीने महाविरणाच्या विरोधात तिव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल असे हि दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व जिल्हाधिकारी यांना हि पाठविण्यात आली आहे.
निवेदनावर ओबीसी युवा मोर्चाचे नगर दक्षिणचे उपाध्यक्ष किरण पाटील अंञे, चिटणिस बिपीन ताठे, सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, विनोद अंञे, राहुरी तालुका उपाध्यक्ष नारायण धनवट, योगेश गिते, अशोक अंञे, सोशल मिडीया प्रमुख रवींद्र दिघे, मनोज शिंदे, प्रशांत अंञे, संदीप अनाप, चंद्रकांत शिंदे, अवधूत चोरमुंगे, नंदकुमार कडु, राजेंद्र कडु आदी पदाधिकारी व उपस्थित शेतकरी बांधवांच्या सह्या असून श्री टेकाळे यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या