श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादीच्या वतीने राहुरी शहरातील बडोदा बॅंकेला आंदोलनाचा इशारा

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी शहरातील बँक ऑफ बडोदा या बँकेचे शहरात एटीएम मशीन सुरू करा, खातेदारांच्या मूलभूत समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी यानी राहुरी बडोदा बॅंकेचे शाखाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.

श्रमिक मुक्ती दलाचे संदीप कोकाटे, पुरोगामी संघटनेत काम करत असलेले राजीव दाभाडे व दुर्गेश वाघ यांनी प्रत्यक्ष शाखाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. राहुरी तालुक्‍याच्या ठिकाणी असलेली बँक ऑफ बडोदा या शाखेतील ग्रामीण भागातील व शहरातील बँक ऑफ बडोदा या शाखेत असंख्य जनतेचे खाते आहेत. या जनतेला वेळेवर पासबुक मिळत नाही, खातेदारांना कार्यालयात तासनतास बसावं लागतं कर्मचारी योग्य दखल घेत नाहीत. आपल्या बँकेच्या शाखेत पासबुक प्रिंट, नवीन पासबुक, तसेच एटीएम कार्ड वेळेवर मिळत नाही. जरी एटीएम कार्ड आपल्या शाखेने प्राप्त करून दिले तरी ते सुरू करण्यासाठी नेट बँकिंग हे कारण सांगितले जाते.

परंतु भारतातील सर्वच जनता शिकलेली नसल्या कारणास्तव सगळ्यांकडेच अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाहीत, याचाही गांभीर्याने विचार आपली शाखा घेत नाही. बँकेकडून सांगण्यात येते की, मोबाईलवर ॲप डाऊनलोड करा, नेट बँकिंग फॉर्म भरा, जरी ही सर्व प्रक्रिया केली तरी मिळालेल्या नवीन एटीएम कार्ड सुरू होत नाही व नवीन एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी तालुक्यातील गुहा किंवा अहमदनगर, श्रीरामपूर या ठिकाणी तुम्हाला याच शाखेतील मिळालेली एटीएम कार्ड घेऊन इतर ठिकाणी जाऊन ते सुरू करा अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तरी आपल्या बँकेच्या शाखेजवळ असलेले एटीएम मशीन धूळखात बंद पडलेले आहे आणि शहरात आपल्या बँकेचे एकही एटीएम मशीन सुरू नाही. दुसऱ्या बँकेचे एटीएम मशिनचा वापर केला असता ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

तरी त्वरित आपण एटीएम मशीन सुरू करावे व तसेच मूलभूत गरजा असलेले पासबुक, एटीएम कार्ड वेळेवर न मिळणे, एटीएम मशीन वर्षापासून बंद आहे, अशा मूलभूत समस्या या शाखेत असलेल्या खातेदारांच्या आहेत आणि या सर्व मूलभूत समस्या निदर्शनास आल्याने समस्या सोडविण्यात आला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेखी निवेदन राहुरीचे तहसीलदार व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आलेले आहे. संबंधित वरिष्ठ कार्यालयांना देखील या मूलभूत गरजा दूर होण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे कळविले जाईल असे श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख संदीप कोकाटे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या