संगमनेर शहर : निमज येथे एक महिन्यापूर्वी संगमनेर तालुका दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते पांडुभाऊ कासार यांच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद धांदरफळ गटाचे विद्यमान सदस्य रामहरी कातोरे यांच्याकडे दिव्यांग बांधवांसाठी भरीव योगदानाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळेस त्यांच्या या सूचनेस अनुसरून कार्यकुशल जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी धांदरफळ गटातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी शासकीय पातळीवर ज्या काही विविध योजना आहे, त्या योजनांचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांसाठी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवून देण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न तर करीनच परंतु स्वखर्चातून धांदरफळ गटातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक लाख रुपयाचा अपघाती विमा काढणार आहोत असे त्यावेळी सांगितले होते.
|| बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ||
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीचा प्रत्यय आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निमज येथे आला. जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी बोलल्याप्रमाणे बरोबर एक महिन्याच्या आत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत " दिव्यांग सन्मान सोहळा " आयोजित केला. त्या मध्ये निमज, धांदरफळ खु., सांगवी येथील दिव्यांग बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात विमा पॉलिसीचे प्रमाणपत्र देण्यात आले, व उर्वरित गावांतील दिव्यांगांच्या ही पॉलिसी संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आल्या.
याप्रसंगी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक इंद्रजितभाऊ थोरात, शेतकी संघाचे व्हा.चेअरमन संपतराव डोंगरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, पंचायत समिती सदस्य नीशाताई कोकणे, आदर्श युवा उद्योजक निखिल कातोरे, निमज गावचे सरपंच गोरक्ष डोंगरे, उपसरपंच सौ. शैलाताई कासार, निमज गावचे सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विलासराव कासार, निमज ग्रामपंचायतचे सदस्य अरुण गुंजाळ, सागर डोंगरे, निमज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन तुकाराम गुंजाळ तसेच ग्रामपंचायत सांगवीचे विद्यमान उपसरपंच नवनाथभाऊ कातोरे, ग्रामपंचायत धांदरफळचे युवा सरपंच रोहिदासशेठ खताळ, पेमगीरी सरपंच सोमनाथ गोडसे, धांदरफळ विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शरद कोकणे, सतीष पाटील खताळ, बालचंद कातोरे, विरभद्र पतसंस्थेचे व्हा.चेअरमन विजय गुंजाळ, सरस्वती पतसंस्थेचे मा.चेअरमन अशोकराव डोंगरे, विरभद्र दूध उत्पादक संस्थेचे संचालक शरद डोंगरे तसेच धांदरफळ गटातील अनेक गावचे पदाधिकारी व दिव्यांग बंधुभगिनी या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित होते.
0 टिप्पण्या