राहुरी खुर्द पोट निवडणूकीत वार्ड क्रं ३ मधुन ६९ मतदारांचे नावे गायब; मतदार आंदोलनाच्या पवित्र्यात

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी खुर्द ग्रामपंचायतीची 8 महिन्यापूर्वी निवडणूक झाली होती. निवडणुकी नंतर अवघ्या 8 महिन्यातच राहुरी खुर्दच्या सरपंच सौ निर्मलाताई मालपाणी ह्यांचे निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग 3 ची पोट निवडणूक होत आहे. ह्या प्रभागातील 69 मतदारांनी मतदान केले होते त्या मतदारांना विश्वासात न घेता सत्ताधारी गटाने आमची नावे बी एल ओ ग्रामसेवक व तलाठी ह्यांनी पोट निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन इतर प्रभागात समाविष्ट केल्याचे लक्षात येताच सदर मतदारांनी ह्या विरुद्ध राहुरी तहसीलदार ह्यांचे कडे तक्रार अर्ज दाखल करून आमची दुसऱ्या प्रभागात टाकलेली नावे तातडीने रद्द करण्याची मागणी भाऊसाहेब अशोक मनतोडे सह 11 कुटुंब प्रमुखांनी मागणी केली आहे.

तहसीलदारांना दिलेल्या अर्जात भाऊसाहेब अशोक मनतोडे सह इतरांनी म्हंटले आहे की राहुरी खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक 8 महिन्या पूर्वी जेव्हा झाली. त्यावेळी आम्ही सर्व प्रभाग 3 मधील रहिवाशी असून आमच्या कडे त्याबाबतची सर्व कागदपत्रे असून गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आम्ही प्रभाग 3 मध्येच राहत आहोत. 8 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत आम्ही सर्वानी ह्याच प्रभागातून मतदान केलेले होते. राहुरी खुर्दच्या सरपंच सौ निर्मलाताई मदनलाल मालपाणी यांचे निधन झाल्यामुळे ह्या प्रभागातील रिक्त जागेसाठी पोट निवडणूक होत आहे. पोट निवडणुकीसाठी जेव्हा मतदार यादी प्रसिद्ध झाली तेव्हा आम्हाला समजले की आमची नावे ह्या प्रभागातून वगळून अन्यत्र म्हणजे प्रभाग 1 मध्ये टाकण्यात आली. तर काही नावे इतरत्र टाकल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही नावे सत्ताधारी गटाने दुसऱ्या प्रभागातील नावे प्रभाग 3 मध्ये टाकली आहे. केवळ पोट निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा याच उद्देशाने आमची नावे वगळण्यात आली असून निवडणुकी पूर्वी आमची नावे आपण आपल्या यंत्रणे द्वारे तातडीने तपासून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी दिलेल्या अर्जात करण्यात आली आहे.

तहसीलदार ह्यांना आज दिलेल्या अर्जात भाऊसाहेब अशोक मनतोडे, हसीना अन्सार पठाण, शेख सैद निसार, शेख मेहराजबी शकील, शेख निसार उस्मान, शेख हसाबी निसार, अन्सार इब्राहिम पठाण, प्रकाश हरिभाऊ साळवे, कांचन दिपक सत्रे, राधा मंगेश गरड आदिनी अर्ज दाखल केले आहे.आमच्या अर्जाचा तातडीने विचार न झाल्यास आम्ही सर्व जण तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या