कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. मुकुंद शिंदे यांची निवड

राहुरी शहर/अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. मुकुंद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

माजी विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी राजीव रॉय व अरुण देशमुख तर सचिवपदी डॉ. विक्रम कड, सहसचिवपदी अमोल धाडगे व खजीनदारपदी डॉ. सुनिल कदम यांची निवड निवडून आलेल्या सदस्यांमधून बिनविरोध करण्यात आली. तसेच या संघटनेमध्ये नवनिर्वाचित सदस्य म्हणून शिवाजी पाटील, अमीत गुरव, विनायक वसगडे, डॉ. भाऊ गावित, अमिता अडसुरे, रोहिणी हुजरे, रोहित क्षीरसागर, योगेश लोखंडचूर व दगडू पारधे यांचीही निवड बिनविरोध करण्यात आली. अरुण पाटील, जी.आर. अनाप, एन.जे. ठाकूर, एल.व्ही. पिंगळे व भाऊसाहेब साबळे यांची संघटनेच्या सल्लागारपदी सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये पुढाकार घेतला.

माजी विद्यार्थी संघटनेच्या नवनिर्वाचीत सर्व सदस्यांचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार व माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्व सभासदांनी अभिनंदन केले. डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना अत्यंत बळकट व क्रियाशील असून आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून माजी विद्यार्थी कल्याण तसेच समाजसेवेमध्ये या संघटनेने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. यापुढेही संघटना अधिक मजबूत करुन संटनेटनेच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांसाठी कृषि अभायांत्रिकी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आश्वासन अध्यक्ष डॉ. मुकुंद शिंदे यांनी यावेळी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या