सरस्वती भुवन प्रशालेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


विलास लाटे/ पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक राजेंद्र कोठावदे,  एस.आर. कुलकर्णी, मनिषा सोनवणे, श्यामला मेश्राम, संतोष शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी पर्यवेक्षक राजेंद्र कोठावदे, श्रीमती एस.आर. कुलकर्णी, संतोष शिंदे, मनिषा सोनवणे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण शैलीत प्रकाश टाकला. उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब आंबेडकर यांची अभ्यासूवृत्ती आत्मसात करण्याचा सल्ला दिला.

याप्रसंगी ऋतुजा कवडे हिने अतिशय सुंदर असे भीमगीत सादर केले. समर्थ सांगडे, प्रांजल घनवट, प्रचिता कळसकर या विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. नंदा गायकवाड, अथर्व निकाळजे, मयुरी जाधव या विद्यार्थ्यांनी सुंदर असे भित्तीपत्रके तयार केली. मनिषा सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिज्ञासा भवर, यश सर्जे यांनी केले, आभार गायत्री मिसाळ हिने मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्यामला मेश्राम, मनिषा सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या