इनरव्हिल क्लबचे कार्य कौतुकास्पद -श्रीमती संतोष सिंग

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : येथील इनरव्हिल क्लब श्रीरामपूर या सेवाभावी संस्थेने नगरपालिका शाळा क्र. ७ मोरगे वस्ती श्रीरामपूर या शाळेचे सुशोभीकरण व बोलक्या भिंती यासाठी भरीव अशी मदत केली. त्याची पहाणी करणेसाठी डिस्ट्रिक्ट चेअरमन श्रीमती संतोष सिंग यांनी शाळेस भेट दिली. व या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

समाजातील विविध वंचित घटकांसाठी इनरव्हिल क्लब सतत कार्य करते. यासाठी श्रीरामपूर टिम अतिशय चांगले काम करत आहे. याचा मला अभिमान वाटतो. इनरव्हिल क्लब श्रीरामपूर ने आतापर्यंत नगरपालिका शाळा क्र. २,३,१ याशाळांसाठी भरीव मदत केली आहे. त्यामध्ये स्वेटर, बूट, वृक्षारोपण, प्रदुषण ,स्वच्छ पाणी, शाळा सुशोभीकरण, बोलक्या भिंती,शैक्षणिक साहित्य वाटप आदि उपक्रम राबविले आहे.

कार्यक्रमासाठी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा ममताजी गुप्ता, सेक्रेटरी रतनताई देशमुख, डॉ. ज्योत्स्नाताई तांबे, सुनिताताई धुमाळ, राखीताई बिहाणी, मंगलताई आढाव, प्रियाताई अग्रवाल, नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्य संघटक नवनाथ अकोलकर, अहमदनगर नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष फारुक भाई शाह,  शाळा क्र. ३ च्या मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई कुर्हे, शाळा क्र. ८ चे मुख्याध्यापक अजय शिंदे, श्रीमती वर्षाताई वाकचौरे , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ वंदनाताई मोरगे उपाध्यक्षा योगिताताई जगदाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या वतीने डिस्ट्रिक्ट चेअरमन श्रीमती संतोषसिंग यांचा सन्मान करण्यात आला. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ममता गुप्ता यांचा व त्यांच्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. ममता गुप्ता यांनी भविष्यात देखील शाळेसाठी यापुढेही मदत केली जाईल असे आश्वासन दिले. शाळेचे सुशोभीकरण व बोलक्या भिंतीचे चांगले रंगकाम केल्याबद्दल पेंटर अनिल पंडित यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा जयकर, सौ रजनी कर्डीले, सौ. मंदाकिनी गायकवाड यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ अकोलकर यांनी तर आभार सौ. रजनी कर्डीले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या