धोक्यात आलेले ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होईपर्यंत प्रशासनाने निवडणुका घेऊ नये - प्रकाश पोटे

निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात उप जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे पदाधिकारी...

अहमदनगर/ जावेद शेख : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे धोक्यात आलेले ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होईपर्यंत प्रशासनाने येणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी च्या राजकीय आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यातून हे नक्कीच दिसत आहे की पुढील काही दिवस किंवा काही महिने तरी ओबीसींचे राजकीय आरक्षण हे धोक्यात आहे. यात केंद्र शासन किंवा राज्य शासन ज्यांनी कुणी ओबीसींचा इंपिरियल डेटा कोर्टात सादर करण्यास दिरंगाई केली त्या जबाबदार असतीलही, परंतु यासाठी दोषी कोण, याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सर्व वेळकाढू पणा मुळे ओबीसी बांधवांवर निदान काही महिने तरी हा राजकीय अन्याय होणार आहे, हे निश्चित दिसत आहे.

परंतु निवडणूक आयोग भारत सरकार यांच्याकडे कळकळीची विनंती आहे की आपण पुढे येऊ घातलेल्या सर्व सार्वत्रिक निवडणुका जोपर्यंत ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण हे पूर्ववत होत नाही तोपर्यंत निवडणूका रद्द अथवा पुढे घेण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत एस. एस.तेलधुणे, विकास बडे, दीपक गुगळे, विजय मिसाळ, शहानवाज शेख, वसीम शेख, फारुक शेख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या