ढाकेफळ येथे जागतिक अपंग दिन साजरा


विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे जागतिक अपंग दिना निमित्ताने शुक्रवार,३ डिसेंबर रोजी सकाळी आकरा वाजता अपंगांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.

आपल्या शारीरिक अपंगावर निराश न होता आपल्याला मिळालेल्या ईतर शारीरिक अवयवांचा अधिक प्रभावीपणे वापर करुन आज कित्येक अपंगांनी धडधाकट लोकांपेक्षा अधिक नेत्रदिपक प्रगती केली. आता आपंगानी ईतर कोणावरही अवलंबून न राहता स्वकर्तुत्वाने आणि जिद्दीने स्वताःचे अस्तित्व निर्माण केले पाहीजे.असे भावनिक समोपदेशन विष्णू आदमाने आणि संजय शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी विष्णू आदमाने, संजय शिंदे, सोनाली मतकर, रीतेश श्रीसुंदर, शुभम दळे, विठ्ठल कोकाटे, श्रेयश श्रीसुंदर या अपंग बंधू, भगिनींने उपस्थित राहुन अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या