राहुरी शहर/अशोक मंडलिक : २ डिसेंबर रोजी वीज पंपाची सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी या मागणी साठी प्रहार जनशक्ती पक्षाने राहुरीत रास्ता रोको केला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. दि. १६ डिसेंबर रोजी त्यांची जेल मधून सुटका झाली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, राज्य प्रवक्ते ह भ प विजय महाराज बारस्कर, सैनिक संघ राज्य महिला अध्यक्ष पुष्पाताई मुंडे, प्रहार सामाजिक कार्यकर्त्या दिपाली पाटील, राहुरी प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारी आदींनी सुटका झालेले प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश लांबे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक येवले, लहानु तमनर, जिल्हा समन्वयक नितीन पानसरे आदींचा पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष संतोष पवार म्हणाले की, आम्ही न्यालयात दाद मागणार आहोत.
0 टिप्पण्या