श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव ग्रामपंचायतची अत्यंत चुरशीची समजली जाणारी पोटनिवडणुकीत आज सकाळी निकालाच्या दिवशी एकतर्फी निकाल लागला आहे.
रामभाऊ गुणवरे, अंबादास दरेकर गुरुजी व मुक्ताजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पॅनेलने सौ. सारीका राजेंद्र दरेकर या उमेदवार उभा होत्या. त्यांना या पोटनिवडणुकीत ५१७ मते मिळाली व प्रतिस्पर्धी जनसेवा पॅनेलच्या मनिषा नवनाथ भुजबळ यांना २२२ मते मिळाली आहे.
या निवडणुकीत सारीका राजेंद्र दरेकर या २९५ मतांनी दणदणीत विजयी झाल्या आहेत. नवनिर्वाचित सदस्या यांचे घनःशाम आण्णा शेलार यांनी अभिनंदन केले आहे. निवडून आलेल्या उमेदवारानी मतदारांचे आभार मानून गुलालाची उधळण केली आणि आनंदोत्सव साजरा केला.
आजचा विजय हा सर्व सामान्य जनतेचा आहे. मी माझ्या पदाचा वापर सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करीन._ नवनिर्वाचित सदस्या सारीका दरेकर
0 टिप्पण्या