लोणी : लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक एड्स दिन साजरा केल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा.अमोल सावंत यांनी दिली.
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस एड्स या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी जगभरात जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. ह्यूमन इम्युनोडीफीशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) हा विषाणू मानवाच्या प्रतिकारशक्तीला नष्ट करतो आणि त्या मुले संक्रमित व्यक्तीला विविध रोग होतात. या जीवघेण्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स दिन साजरा केला. या वेळेस राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर सर यांनी विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी एचआय़व्ही संक्रमणाचे कारणे, लक्षणे आणि त्यासंदर्भात असणारे गैरसमज या विषयी माहिती दिली. त्यावेळेस त्यांनी आवाहन केले कि विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांनी एड्स निर्मुलन लढ्यात सहभाग घ्यावा आणि सामाजिक जनजागृती करावी.
यावेळेस कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत, प्रा. महेश चंद्रे, प्रा.स्वप्नील नलगे आदी शिक्षकवृंद तसेच श्री.पाटोळे, श्री. आशपाख शेख आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार रासेयो स्वयंसेविका कु.वेदिका वारघडे हिने केले.
0 टिप्पण्या