अखेर पिंपळगाव नाकविंदा स्मशान भूमी परिसरातील स्ट्रीट लाईट चा प्रश्न मार्गी

अकोले- तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथिल स्मशान भूमी परिसरातील स्ट्रीट लाईटचा प्रश्न गावच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. गेली अनेक वर्षे या गावातील बहुतेक अंत्य विधीचे कार्यक्रम अक्षरशः रात्रीच्या अंधारात झाले. कित्येक वेळा टेंभे- टॉर्च लावून ग्रामस्थांनी आज वर रात्रीचे या स्मशान भूमी मध्ये अंत्य विधी केले आहे. अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांची मागणी होती की स्मशान भूमी परिसरात लाईट ची सोय झाली पाहिजे आज अखेर या स्मशान भूमी परिसरातील स्ट्रीट लाईट चे काम मार्गी लागले असून आज प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्याने या कामाचे उद्घाटन पार पडले असल्याची माहिती मारुती मेंगाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पुढे म्हटले आहे की गावच्या दृष्टीने स्मशान भूमी परिसरात लाईटची सोय करणे ही महत्वाची बाब होती. आज वर कित्येक गावातील अंत्य विधी हे रात्री अप रात्री झाले. कधी टेंभे लावून तर कधी टॉर्च लावून ग्रामस्थांनी आज वर अंत्य विधीचे कार्यक्रम केले. गावात एखादी दुःखत घटना घडली आणि तो अंत्य विधी जर रात्रीचा असला की मग त्या कुटुंबातील सदस्यांना तसेच गावातील प्रमुख मंडळींना या गोष्टींचा सामना करावा लागत होता. गावापासून काही अंतरावर या गावाची स्मशान भूमी असल्याने येथे लाईट ची कोणतेही सोय नव्हती. एखादा अंत्य विधी करायचा म्हटलं की तो अंधारात करायची वेळ यायची.

गेली अनेक वर्षे या स्मशान भूमी परिसरात अक्षरशः अंधारात अंत्य विधी झाले. संपूर्ण गावाची मागणी होती की या परिसरात किमान लाईटची सोय झाली पाहिजे. गावच्या इतर  विकास कामाच्या तुलनेत हे काम गावच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. या कामाला विशेष प्राधान्य देत पंचायत समिती सेस १५ वित्त आयोगातून हे काम मार्गी लावले असून या स्मशान भूमी परिसरात तब्बल १० पथ दिवे बसविले असल्याने या परिसरात विजेचा लख लखाट पाहायला मिळत असून अकोले तालुक्यातील पहिली स्मशान भूमी असेल की पूर्ण स्मशान भूमी परिसर लाईट च्या उजेडा खाली आली आहे.

गेली अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली असून या नंतर पिंपळगाव नाकविंदा स्मशान भूमी परिसरात प्रकाश या माध्यमातून आता दिसणार आहे. या पुढे गावातील एकही अंत्य विधी रात्रीचा अंधारात होणार नसल्याची माहिती माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी दिली आहे.

या उद्घाटन प्रसंगी दिपक कासार, विनोद हांडे, प्रकाश कासार, दिपक पथवे, बबन अभाळे, मारुती अभाळे, वाळीबा लगड, संपत लगड, नवनाथ काळे, बाळासाहेब काळे, विलास काळे, दत्तु काळे, राजू काळे, विशाल काळे, प्रविण वाघ, सचिन सदगीर, गणेश बगनर, देवराम बगनर, काशिनाथ लगड, चंदर मेंगाळ, शिवराम सदगिर, राधाकिसन लगड, नवनाथ जाधव, नवनाथ लगड, गोरख अभाळे, ज्ञानेश्वर मेंगाळ, रामदास लगड, बाळू लगड, गणपत वाळके, जालिंदर मोहिले, नामदेव काळे, भानुदास कासार, रामदास गावंडे, पांडु बोऱ्हाडे या सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या