देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे डिजिटल ग्रंथालय

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : आधुनिक युगात तंञज्ञानाचा उपयोग सर्वच स्तरातून होत आहे. देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या श्री. ञिंबकराज मोफत वाचनालय 40 हजार लोकसंख्येच्या शहरात मोठ्या वास्तूत वसवले आहे. मुख्याधिकारी अजित निकत यांनी दुरदृष्टी ठेवून ग्रंथालयाकडे बारकाईने लक्ष देवून डिजिटल ग्रंथालय करण्याचा मानस केला होता. त्यानुसार आज ग्रंथालय डिजिटल झाले आहे.

देवळाली प्रवरा नगर पालिकेचे श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयाची 1956 साली स्थापना झाली. देवळाली प्रवरातील नागरिकांना ग्रंथ व मोफत वृत्तपञ वाचन सेवा देत आहे. महाराष्ट्र शासनाने 1960 साली वाचनालयास मान्यता दिली आहे. आज वाचनालयाचा दर्जा 'अ' आहे. 65 वर्षापासून वाचनालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

वाचनालयामध्ये सर्व वर्गातील वाचकांसाठी कथा, कादंबरी, योगशास्त्र, नाटक, स्पर्धा परीक्षा, धार्मिक, ऐतिहासिक, शेती विषयक, कायदेविषयक, पाककला व इतर असे एकूण 27000 ग्रंथसंपदा असून विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके व दिवाळी अंक उपलब्ध आहेत. वाचनालयातर्फे नागरिकांना पारायण सप्ताह साठी ज्ञानेश्वरी व इतर धार्मिक ग्रंथ मोफत उपलब्ध करून दिले जातात. दैनंदिन वाचणासाठी वर्तमानपत्रही मोफत उपलब्ध करून दिली जातात. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक प्रशस्त वाचनालयाशी संलग्न अभ्यासिका उपलब्ध करुण देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षार्थी कडून एक रुपयाही आकारण्यात येत नाही. पालिकेच्या वतीने मोफत सेवा देण्यात येत आहे.

वाचनालयाची देवळाली प्रवरा गावामध्ये तीन मजली प्रशस्त इमारत आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते 8 या कालावधीमध्ये मोफत वाचन सुविधा दिल्या जात आहे. वाचनालयामध्ये महिलांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे. पाक कला, मेहंदी कला, शिवणकला, आरोग्यविषयक व इतर ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. तसेच महिलांसाठी शिवणकला वर्ग भरवले जातात तसेच बालवाचकांसाठी स्वतंत्र बालविभाग व ग्रंथ मोफत उपलब्ध आहेत.

देवळाली प्रवरा नगर परिषदेचे अध्यक्ष सत्यजित कदम यांच्या दूरदृष्टीने व मुख्याधिकारी अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालयाचे ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी वाचनालय अद्यावत व संगणीकृत केले आहे. त्यासाठी संगणक संच व इतर साहित्य खरेदी करण्यात आले आहे. वाचनालयातील सर्व 27 हजार ग्रंथाना बारकोड करून संगणीकृत केले असून, वाचनालयाचे सर्व कामकाज बारकोड व संगणकाच्या माध्यमातून केले जाते. तसेच वाचनालयातील 27 हजार ग्रंथसंपदा मांडणीसाठी 25 नवीन बुककेस खरेदी करून बारकोड प्रमाणे ग्रंथ मांडणी केली आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रंथाला एक निश्चित जागा उपलब्ध झाली आहे.

तसेच वाचकांना ग्रंथ शोधण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित केले असून सर्व ग्रंथांची माहीती त्या मध्ये उपलब्ध आहे. वाचनालय संगणकीकृत झाल्यामुळे वाचकांना जलद सेवा देणे, वाचनालयातील अभिलेख तयार करणे, व ग्रंथांची निगा राखणे सोपे झाले आहे. त्यामुळे वाचकांना 27 हजार ग्रंथांमधून अपेक्षित ग्रंथ शोधणे सहज शक्य झाले आहे. याप्रमाणे भविष्यातही वाचनालय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न कायम राहिल असे ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी सांगितले.

मुख्याधिकारी निकत यांनी केला खर्च 
वाचनालयासाठी अंतर्गत सजावट करण्यासाठी विद्येची देवता सरस्वती मुर्ती व लेखक व कवी यांचे तैलचिञ (फोटो) स्वखर्चाने लावले असल्याने आतील बाजुचा कायापालट झाला आहे. मुख्याधिकारी अजित निकत यांनी देवळाली प्रवरा नगर पालिकेचा पदभार स्वीकारल्या नंतर प्रथम वाचनालयास भेट देवून ग्रंथालयाची माहिती घेवून सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या. काही खर्च मी स्वतः करण्यास तयार असल्याचे मुख्याधिकारी निकत यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे अंतर्गत सजावट व इतर कामे सुरु झाल्या नंतर मुख्याधिकारी निकत स्वखर्चातून तैलचिञे व सरस्वती मुर्ती आदींचा खर्च मुख्याधिकारी अजित निकत यांनी केला आहे.
  
"भविष्यामध्ये वाचनालय ई-लायब्ररी मध्ये रुपांतरीत करणार; नगराध्यक्ष सत्यजित कदम 
      श्री.ञिंबकराज वाचनालयात अधुनिक तंञज्ञान वापरून डिजिटल करण्यात आले आहे. भविष्यात ई- लायब्ररी संकल्पना आहे.वाचनालयाचे स्वतंञ अँप निर्माण करुन प्रत्येक नागरीकास घर बसल्या पुस्तक वाचन किंवा मागणी करता आले पाहिजे.अधुनिक तंञज्ञान पुढे जात असल्याने काळाचे पावले ओळखुन आपण चालले पाहिजे. त्यादुष्टीने ञिंबकराज वाचनालयात सुधारणा केली जाणार आहे.
_ सत्यजित कदम; नगराध्यक्ष देवळाली प्रवरा नगर पालिका 

देवळाली प्रवरा शहरात इतर शहराच्या मानाने सर्वात मोठे वाचनालय आहे."श्री त्रिंबक्रज मोफत वाचनालय मध्ये स्पर्धा परीक्षा साठी आवश्यक असणारे सर्व विषयाची पुस्तके उपलब्ध असून, तरुणांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ फायदा घेवून स्पर्धा परीक्षेत यश मिळविले पापालिका
_ अजित निकत; मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगर पालिका

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या