श्रीरामपूर /बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदीरगाव येथील ग्रामपंचायत प्रभाग ६ च्या एका जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरु झाली. त्यासाठी निवडणूक अधिकारी पी बी पावसे हे काम पहात आहेत. एका जागेसाठी पाउलबुद्धे, ससाणे गटाचे विलास इंद्रभान भालदंड व मा.आ.भानुदास मुरकुटे, सुरेश पाटील गलांडे गटाचे अशोक रेवजी भालदंड यांनी अर्ज दाखल केले होते.
परंतु गावाच्या विकासासाठी, कोरोना काळात गर्दी होऊ नये, उमेदवारांना आर्थिक ताण पडू नये आदी सर्व बाबींचा विचार करून सर्व पक्षीय बैठक व संमती घेऊन अशोक रेवजी भालदंड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आज दि ९ डिसेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याचे दिवशी विलास भालदंड यांचा एकमेव अर्ज एका जागेसाठी असल्याने ते बिनविरोध निवडून आले आहे.
दोन्ही बाजूचे प्रमुख सुरेश पाटील गलांडे, राजेंद्र पाटील पाउलबुद्धे तसेच सरपंच सुभाष बोधक व सर्व ग्रा.प.सदस्य, माजी सरपंच लक्ष्मणराव सरोदे, बाळासाहेब रोकडे, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब नाईक, भाऊसाहेब पडोळे, राजेंद्र नाईक, राजेंद्र गीऱ्हे, रमेश गायके, विनायक भालदंड, प्रकाश ताके, शिवाजीराजे भालदंड, भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब नाईक, सोपानराव नाईक, मच्छिंद्र आढाव आदी सर्वांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेतला होता.
0 टिप्पण्या