राजेंद्र कोठावदे यांची उपमुख्याध्यापकपदी नियुक्ती

पैठण/ विलास लाटे : तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या उपमुख्याध्यापकपदी राजेंद्र कोठावदे यांची नुकतीच संस्थेच्या आदेशानुसार पदोन्नती करण्यात आली आहे.

राजेंद्र कोठावदे हे इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक असून शिस्तप्रिय, कुशल संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य, शालेय समिती सदस्य किसनलाल तोतला, डॉ. मिलिंद कोनार्डे, मच्छिंद्र पाटील हाडे, डॉ.अंताराम धरपळे, दामोदर पाटील डुबे, बबनराव ठाणगे, संजय दौंडे, ज्ञानेश्वर चाटुपळेंसह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या