श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था स्थापनेपासूनच समाजामध्ये सातत्याने समाजहितासाठी उत्कृष्ट कार्य करत आहे. तसेच या संस्थेमध्ये अनेक सेवाभावी लोकांचे संघटन हे आदर्शवत आहे.
भूमी फाऊंडेशन च्या माध्यमातून नि:स्वार्थ भावनेने समाजहिताचे विविध उपक्रम अनेक सेवाभावी लोकांच्या सहकार्याने राबवली जातात. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.मनीषा शुक्ला ह्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये तर अध्यक्षस्थानी अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.शेळके उपस्थित होते.
डॉ. शुक्ला पुढे म्हणाल्या, दिव्यांग व्यक्ती जन्माला येणार नाही यासाठी प्रथम काळजी घ्यावी, त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीच्या विकास संधीची समानता, समाजात सन्मानाची वागणूक, दिव्यांगांच्या संपत्तीबाबत सुरक्षा पारित असलेल्या कायद्याची समाजात जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. असेही डॉ. शुक्ला यांनी सांगून बदलते कायदेविषयक माहिती दिली. कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रामीण साहित्यिक प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या "माणुसकीची हाक" या कवितेतून करण्यात आला. त्यांनी दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक आणि मानसिक शोषण थांबले पाहिजे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक,स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष कैलास पवार यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. माजी प्राचार्य टी.ई शेळके यांनी अध्यक्ष भाषणात सांगितले की समाजातील सर्वच प्रश्न कायद्याने सुटू शकत नाही. त्यासाठी सर्व स्तरावरून समाजाने एकत्र येत प्रशासनाला सहकार्य करत समाजातील प्रश्न सोडवणे ही गरज आहे. नियमितपणे आणि सातत्याने समाज हिताचे उपक्रम भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था राबवत असते. कैलास पवार हे आमचे विद्यार्थी आहेत, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो असेही त्यांनी सांगितले. प्रमुख आणि उपस्थित मान्यवरांचे आभार आरोग्यमित्र भीमराज बागुल यांनी मानले.
याप्रसंगी मुंबई येथील अभिनय क्षेत्रात अग्रेसर असणारे अजित भालके, तसेच सचिन काळे, संगीता जाधव, आदेश पवार, अनुष्का, साई, ऋतुजा, मुदरशीर, भाग्यशा, श्रावणी, जुबिया, आयत इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या