संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी आढांगळे

राहुरी शहर/अशोक मंडलिक : सामाजीक कार्यकर्ते रोहिदास आढांगळे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदि निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

रोहिदास आढांगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे. त्यांनी आतापर्यंत समाजातील अनेक दुर्बल घटकांना न्याय मिळवून दिला आहे. ते स्वतः पायाने दिव्यांग असुन देखील समाजातील गरीब घटकांसाठी नेहमी धडपडत असतात. राहुरी तहसिल कार्यालयाच्या आवारात कितीही सर्वसामान्य माणूस आपलं काम घेउन आला तर त्यांच्या कामाची सोडवणुक तातडीने करून देतात. मग त्या मानसाकडे पैसे असो अथवा नसो हि बाब त्याची वैशिष्ट्यपूर्ण आहे.

त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन स्वतः राहुरी चे कर्तव्यदक्ष तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या शिफारशीनुसार त्याची निवड करण्यात आली आहे. त्यांचे नगरसेवक अशोक आहेर, पत्रकार राजेंद्र वाडेकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आढाव यांनी त्यांना समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या