१९ डिसेंबरचा इपीएस९५ पेन्शन धारकांचा लखनौ महामेळावा रद्द

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या नेतृत्वाखाली इपीएस ९५ पेन्शन धारकांच्या १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता लखनौ पं.गोविंद वल्लभ पंत सांस्कृतिक उपवन निशांत गंज गोमती तट येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

ते कोरोना तसेच ओमिक्रोन आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून दक्षता घेण्याच्या कारणास्तव लखनौ पोलीस प्रशासनाने ३१ डिसेंबर पर्यंत १४४ कलम त्याचप्रमाणे गर्दीच्या सर्व कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या देशातील वयोवृद्ध पेन्शनधारकांना कोणताही त्रास होऊ नये व गैरसोय होऊ नये सर्वांच्या भावनांचा आदर करून हे राष्टीय महासंमेलन रद्द करण्यात आले आहे अशी माहिती पश्चिम क्षेत्रीय संघटक सुभाष पोखरकर व बी आर चेडे यांनी दिली आहे.

कमांडर अशोक राउत व पदाधिकारी यांनी लखनौ प्रशासनाबरोबर चर्चा केली. या महासंमेलनास येण्यासाठी ज्यांनी रेल्वेची तिकिटे काढली आहेत ती त्वरित रद्द करण्यात यावीत उशिरा रद्द केल्यास जास्त कपात होऊ शकते, याची दक्षता घ्यावी. ज्यांनी देवदर्शन करण्यासाठी वाराणसी अयोध्या, प्रयागराज आदी तीर्थक्षेत्राची तिकिटे काढली आहेत त्यांनी ती रद्द करण्याची गरज नाही. ते विविध ठिकाणी भेटी देऊ शकतात असेही संयोजकांनी सांगितले आहे. हा मेळावा रद्द झाल्याने देशातील पेन्शन धारकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या