अहमदनगर/ जावेद शेख : माणुसकीची नाळ... या संकल्पनेतून शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम भरवण्यात येतात. ज्या समाज्याला कंलकीत नजरेनं पाहिले जात होते, आज त्याच समाजातील तरुणांनी एकत्रीत येऊन आपले जीवन उभारले हे आनंदीदाई आहे. साहित्यिक नामदेव भोसले त्यांच्या सहकार्याचे कौतुकास्पद उपक्रम राबवतात असे मत बारामतीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांनी व्यक्त केले.
या वेळी पोलीस निरीक्षक दिलीप पवार व आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांच्या संकल्पनेतून मच्छिमार करणारे पारधी बांधव व मासे घेणारे व्यापारी यांचा सन्मान डी. वाय. एस. पी गणेश इंगळे, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी गणेश इंगळे यांनी आदिवासी पारधी कुटुंबातील मासेमारी करणा-या बांधवांची अडीअडचणी विषयी विचार पुस केली व मच्छिमारी करणा-या लोकांसोबत मासे पकण्याचा आनंद घेतला. आदिवासी पारधी बांधवांच्या सुख दुःखा मध्ये मिसळून कष्टकरी जीवनाला माणुसकीची नाळ या विचाराला प्रत्येकाने साथ द्यावी असे डी.वाय.एस.पी. इंगळे म्हणाले.
यावेळी कार्यक्रमांला बारामतीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांच्या हस्ते तक्रारवाडी येथे उजनी धरणामध्ये मच्छिमारी करणारे व्यवसायिक व कुंभारगावचे उद्योजक दत्तासाहेब नगरे, हनुमंत पवार, युवराज काळे, ज्ञानू पवार, नितीन पवार, राजू काळे, सोमनाथ भोसले, संतोष भोसले, गणेश पवार, उक्कल भोसले, रेश्मा काळे, वनिता विजय काळे या सर्वांचा भिगवण पोलीस स्टेशन व शेवराई सेवाभावी
संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. इंदापूर, दौंड, ते पंढरपूर,पर्यंत नदीच्या दोन्ही किनारी तिन ते चार हजार आदिवासी कुटुंब मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे कष्टकरी कुटुंबाला शाबासकीची साथ व माणुसकीचा हात, या विचारांना पोलीस आणि पारधी यांच्यात असलेली चोर दरोडेखोर नावाची कलंकित दरी कुठेतरी कमी व्हावी व त्यांच्यामध्ये एक मैत्रीचे नातेे निर्माण व्हावेे. या विचाराने गेली 21 वर्ष राज्यामध्ये नामदेव भोसले हे काम करीत आहे. महाराष्ट्रातील पोलीस विभागाकडून या उपक्रमाला भरभरून साथ मिळत आहे.
सदर कार्यक्रमाला तक्रारवाडीचे सरपंच सतिश वाघ व ग्रामपंचायत सदस्य आणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
आज्ञानाचा अंधार गड्यांनो जोवर संपणार नाही!!
ज्ञानविना समाजक्रांती कधिच होनार नाही!!
0 टिप्पण्या