बिडकीन येथे कर्नाटकातील शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ छावाचे निदर्शने


'त्या' समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

विलास लाटे/पैठण : कर्नाटक राज्यात काही समाजकंटकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये कमालीची संतापाची लाट पसरली असून, या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (१९ डिसेंबर) पैठण तालुक्यातील बिडकीन येथील निलजगाव फाट्यावर शिवप्रेमी व स्वाभिमानी छावा संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

कर्नाटक राज्यातील बेंगलोर शहरात अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांकडून विटंबना झाली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहे. शिवप्रेमींत कमालीची संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बिडकीन येथील निलजगाव फाट्यावर स्वाभिमानी छावा संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी, पोस्टरबाजी करून निदर्शने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित संतप्त शिवप्रेमींनी घटनेचा निषेध नोंदवत सरकारने 'त्या' समाजकटंकांवर गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे अशी मागणी केली आहे.

यावेळी स्वाभिमानी छावाचे जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे, राष्ट्रवादीचे विजय चव्हाण, विकास पाटील गोर्डे, नारायण नरवडे, संतोष  कुसेकर, काकासाहेब टेके, विष्णू मोगल, ज्ञानेश्वर कागदे, नितिन वाघ, अंबादास गुंजाळ, रेवन लोणकर, महेश वैद्य, निकेश राउत, निलेश धडे, विलास औटी,  सुदाम मोगल, दौलत देशमुख, दत्तू अण्णा मोगल, विजय शेळके, धनंजय चिरेकर, नवनाथ चौधरी आदींसह पंचक्रोशीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या