पोलीस निरीक्षक इंगळे यांची कणगर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट

राहुरी शहर/अशोक मंडलिक : तालुक्यातील कणगर ग्रामपंचायत कार्यालयाला राहुरी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे व पो. हवालदार गर्जे यांनी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी त्यांचा स्वयंभू कनकावती मातेची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच बाबासाहेब गाढे, पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव जाधव, ग्रामपंचायत सदस्य महमंद भाई इनामदार, राजेंद्र दिवे, यशवंत जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या