राहुरी : शिवबा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून 'दैनंदिन शिवपूजा' अर्थात आपल्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत आपणा सर्वांचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहुरी कारखाना परिसरातील स्मारकाला दररोज पुष्पहार घालून महाराजांना मानवंदना देण्याचा उपक्रम ४ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आला आहे.
हा उपक्रम ३६५ दिवस असणार आहे. हा दैनंदिन शिवपूजेचा उपक्रम शिवबा प्रतिष्ठाण व शिवप्रेमींच्या आशीर्वादाने व सहकार्याने पूर्णत्वास नेणार आहे. आज 16 डिसेंबर रोजी कोंढवड तालुुका राहुरी येथील श्री शरद दगडू म्हसे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
0 टिप्पण्या