विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राज्याचे रोजगार हमी व ७४ जळगाव वि.का.से.स.सोसायटीची निवडणुक बिनविरोध मंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेष्ठ संचालक राम पाटील एरंडे यांच्या नेतृत्वाखाली १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान राम पाटील एरंडे यांच्या नेतृत्वाखाली १३ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या १३ उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज न दाखल न झाल्याने निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक अनिल पुरी, लक्ष्मीकांत वानखेडे, बाबर, तुकाराम पुरी यांनी निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे जाहीर केले. शिवसेनेच्या गटाचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सोसायटीवर सेनेच्या गटानं वर्चस्व स्थापित केले आहे.
सर्व बिनविरोध संचालक मंडळाचे मंत्री भुमरे, माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, बाजार समिती सभापती राजू नाना भुमरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अंकुश रंधे, दूध संघाचे संचालक नंदू काळे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादा बारे, तालुकाप्रमुख अण्णाभाऊ लबडे, शिक्षक सेना तालुकाप्रमुख अमोलराजे एरंडे, माजी मार्केट कमिटी संचालक मनोहर एरंडे, सरपंच गौतम सोनवणे, उपसरपंच नितीन एरंडे, नारायण सोनवणे, बाबासाहेब मुळे, विक्रम एरंडे, रामभाऊ मतकर, भाऊसाहेब घेगडे, शालेय समिती अध्यक्ष मारोती लाटे, रमेश मुळे, मुरली एरंडे, दत्तू एरंडे सह आदीं गावकरी व शिवसैनिकांनी अभिनंदन केले.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार...
१) राम कोंडीराम एरंडे २) मधुकर कोंडीराम एरंडे ३) दत्तात्रय रखमाजी सुकरे ४) श्रीमंत भानुदास मुळे ५) बबन नानासाहेब पठाडे ६) उद्धव अण्णासाहेब एरंडे ७) सचिन राम एरंडे ८) हरिचंद्र विनायक घेगडे ९) लक्ष्मीबाई सुरेश बजारे १०) अलकाबाई बद्रीनाथ गटकळ ११) सुदाम वामनराव जगधने १२) जनार्धन दत्तू क्षीरसागर १३) भरत रामनाथ मतकर
0 टिप्पण्या