अहमदनगर/ जावेद शेख : राज्याचे ऊर्जा व नगर विकास मंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते गंगाधर पाटीलबा गडधे यांचा ७५ वा वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळा व त्यांची मुलांचा ए.एस.आय पदी निवड झाल्याबद्दल रामदास गंगाधर गडधे व एकनाथ गंगाधर गडधे व नातू महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब कुशीनाथ गडधे यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांची हिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक शाळीग्राम होडगर हे होते. कार्यक्रमासाठी जि प सदस्य धनराज गाडे पाटील, पं. स. सभापतीचे पती आण्णासाहेब सोडणर, विजय तमनर, प्रभाकर गाडे, ज्ञानेश्वर बाचकर, डॉ नितीन खांदे, धीरज पानसंबळ व अन्य तालुक्यातील पदाधिकारी तसेच चिंचाळे व पंचक्रोशीतील ग्रामपंचायत व सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, रेल्वे पोलीस व शिक्षक मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटीलबा गडधे यांनी केले. पुढे आपल्या भाषणात ना. तनपुरे यांनी या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. हा नुसता कार्यक्रम नसून आपणा सर्वांसाठी एक आदर्श उपक्रम असल्याचे ते बोलले. मुलांच्या निवडीबद्दल कौतुक केले व वडिलांना दिर्घयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळीग्राम होडगर यांनी शिक्षणाचं महत्त्व विशद करत गंगाधर गडधे परिवाराचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी व मित्रमंडळ यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी सूत्रसंचालन मुकेश गडधे यांनी केले तर पाटीलबा गडधे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या