उपअभियंता जाधव यांचा छावा क्रांतिवीर सेनेकडून सत्कार

संगमनेर शहर : संगमनेर पंचायत समिती बांधकाम विभागाचा नव्यानेच उपअभियंता पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव यांचा छावा क्रांतिवीर सेनेने सत्कार केला आहे.

श्री जाधव हे बांधकाम विभागात ३४ वर्षांपासून कार्यरत आहेत. या भेटीदरम्यान श्री जाधव यांनी त्यांच्या तरुणपणीच्या मराठा महासेवा संघा सोबत केलेल्या कामांची जुन्या आठवणींना उजाळा देत तालुक्यातील बांधकाम विभागाची चालु असलेली सद्य स्थितीतील कामांची माहिती दिली.

यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे, संगमनेर तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, सतीश गोपाळे आदींनी श्री जाधव यांचा सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या