ढोरकीन शिवारातील विहिरीत आढळला अनोळखी मृतदेह


विलास लाटे /पैठण : पैठण एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील ढोरकीन - बालानगर रस्त्याच्या कडेला असलेल्या ढोरकीन शिवारातील शेतातील विहिरीत शुक्रवार(दि.३) रोजी दुपारच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या आवस्थेत आढळून आला. 

या घटनेची पैठण एमआयडीसी पोलीस ठाणे येथे माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राहुल भदरगे, सहाय्यक फौजदार नामदेव कातडे, पोलीस नाईक गणेश खंडागळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहीरीतून वर काढला व घटनास्थळी पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी पैठण घाटी रुग्नालय येथे पाठविला. मृतदेहाच्या डोक्यावर धारदार शस्राने वार करुन विहीरीत फेकले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.

या घटनेची आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सपोनि भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे यांच्यासह एमआयडीसी पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या