देवळाली प्रवरा/राजेंद्र उंडे : देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे हे नगराध्यक्ष कदम व त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत दिल्ली वारी टाळली. त्यानंतर नगराध्यक्ष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाकडे चोथे यांनी पाठ फिरविली. नगराध्यक्ष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ही न देता आपली नाराजी आणखी उघड केली आहे. सध्या भाजपात परंतू राष्ट्रावादीच्या संपर्कात असलेले नगरसेवक अदिनाथ कराळे व बाळासाहेब खुरुद यांनी हि कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. निवडणूकीपुर्वी भाजपाचे काही नगरसेवक राष्ट्रावादीत जाणार असल्याचे यावरुन संकेत मिळत आहे. यावेळेस राहुरीच्या वाड्यावरुन निवडणूकीचे सुञ हलवले जाणार असल्याचे समजते.
येत्या काही दिवसांनी देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. निवडणूकीच्या दृष्टीने अनेक घडामोडी सुरू आहेत. सत्ताधारी गटाचे सर्वेसर्वा नगराध्यक्ष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. किर्तन, क्रिकेट स्पर्धा, व्याख्याने, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सर्व नगरसेवक पळतील अशी अपेक्षा होती. मात्र ५ वर्षे नगराध्यक्ष कदम यांना प्रिय असणारे नगरसेवक तथा उपाधी मिळालेले राम लक्ष्मण यांनी नियोजन करून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपाच्या अन्य नगरसेवकांनी ते दोघे आहेत ना असे म्हणून बघ्याची भूमिका घेतली.
सत्ताधारी कदम यांच्या कार्यपद्धतीवर सुरुवातीपासूनच अण्णासाहेब चोथे, आदिनाथ कराळे, ज्ञानेश्वर वाणी, बाळासाहेब खुरुद, संजय बर्डे आदी नगरसेवक नाराज होते. हे सर्व कधीही राजीनामे देऊन आपली नाराजी उघड करतील अशी परीस्थिती निर्माण केली जात होती. मात्र त्यानंतर बंद दरवाजा आड काही घडामोडी घडल्या हे वातावरण शांत झाले. मात्र नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी गेल्या २ वर्षापासून सत्ताधारी सत्यजीत कदम यांच्याशी संपर्क कमी केला. उलटपक्षी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी जवळीक साधून आवश्यक ते कामे करून घेतली. त्यानंतर अण्णासाहेब चोथे यांना शेवट शेवट उपनगराध्यक्ष पद देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला. चोथे यांनी केवळ नाव लागेल यासाठी तनपुरे यांची पुर्वपरवानगी घेतली. त्यावेळी माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी हिरवा कंदील दिल्यामुळे त्यांनी उपनगराध्यक्ष पद स्वीकारले. मात्र नगराध्यक्ष कदम व त्यांचे जवळचे राम लक्ष्मण यांनी पालिकेबाबत कोणताही निर्णय घेताना चोथे यांना विश्वासात घेतले नसल्याने अण्णासाहेब चोथे नाराज झालेले होते. त्यामुळे दिल्ली येथे होणाऱ्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी नकार दिला. त्यानंतर नगराध्यक्ष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमकडे व नगराध्यक्ष कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी फिरकलेही नाही. नगरसेवक आदिनाथ कराळे व बाळासाहेब खुरुद यांनी हि वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. ४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी फॅक्टरी येथे भाजप महिला आघाडी व युवा मोर्चा शाखा उदघाटन कार्यक्रम सुरू असताना चोथे-कराळे-खुरूद या तिन्हीही नगरसेवकांत एका संस्थेच्या कार्यालयात बंद दरवाजाआड बसुन गुप्तगु सुरू होते. त्यानंतर राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे फॅक्टरी परिसरात एका कार्यक्रमासाठी आले. ना.तनपुरे व नगरसेवक कराळे यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर नगरसेवक कराळे यांना ना. तनपुरे यांनी आपल्या वाहनात बसवून राहुरीच्या दिशेने घेऊन गेले. राहुरीच्या दिशेने प्रवास करताना ना.तनपुरे व कराळे यांच्या आगामी नगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. एकंदरीत नाराज असलेले चोथे-कराळे-खुरुद-बर्डे हे येत्या काही दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून त्यादृष्टीने हालचाली सुरू असल्याचे समजते. त्या संदर्भात राहुरी फँक्टरी येथिल एका संस्थेत लवकरच बैठक होणार असल्याचे समजते.
राजीनामा देणाऱ्या माऊलीला नेमका काय साक्षात्कार झाला?
सत्ताधारी सत्यजीत कदम यांच्या कार्यपद्धतीवर सुरवातीला अदिनाथ कराळे यांनी नाराजी व्यक्त करुन विषय समित्यामध्ये सभापतीपद नाकारुन सत्ताधारी गटातील नाराजीची मुहुर्तमेढ रोवली. परंतू कराळे यांच्या नाराजीवर राम लक्ष्मण यांनी नगराध्यक्ष कदम यांना दुर्लक्ष करण्यास सांगितल्याने कराळे - कदम दुरावा वाढत गेला. चोथे-कराळे व खुरुद यांच्याबरोबर नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी हि नाराजी व्यक्त करुन अनेक वेळा वाणी यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलावून गटनेत्याकडे राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. परंतू राम लक्ष्मण यांनी बंद खोलीत काय कानमंञ दिला आणी वाणी यांना त्याचा साक्षात्कार झाला. हे अद्याप कोणत्याच नगरसेवकाला समजले नाही. साक्षात्कार नंतर गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक वाणी हे पूर्णपणे शांत झाले आहेत. ५ वर्षात देवळाली प्रवरा शहरात नगरपालिका तथा सत्यजीत कदम यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमांना नेहमी गैरहजरी लावणारे नगरसेवक वाणी सत्यजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सकाळी १० वाजेपासून ते रात्री किर्तन सुटे पर्यंत जातीने हजर राहत आहे. त्यामुळे नगरसेवक वाणी अर्थात माऊलीला नेमका शेवटी काय साक्षात्कार झाला. याबाबत शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. तर वाणी यांनी कार्यक्रमास पुर्णवेळ हजेरी लावल्याने सत्ताधारी गटातील भाजपाच्या नगरसेवकांच्या भुवया उंचवल्या आहे. वाणी यांना राम लक्ष्मणचा साक्षात्कार झाल्याने अनेक नगरसेवक अवाक झाले हे मात्र नक्की...
0 टिप्पण्या