व्यापारी असो.करणार पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पो.नि.इंगळे यांची तक्रार ;पो.नि.इंगळे यांचा व्यापाऱ्यांना उलटा उपदेश...
राहुरी शहर/ अशोक मंडलिक : राहुरी येथे व्यापारी असोसिएशनच्या वतीने राहुरी पोलिस ठाण्याचे पो.नि.राजेंद्र इंगळे यांना गेल्या काही महिन्यांमध्ये राहुरी शहर तथा परिसरात मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे तसेच व्यापारी पेठेत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे, त्या अनुशंघाने चोरांचा बंदोबस्त करावा या मागणी साठी निवेदन देण्यात आले.
राहुरी पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक पदाचा राजेंद्र इंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राहुरी तालुक्यात वेगवेगळ्या भागात अवैध धंदे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे, दरोडे पडण्याचे सत्र सुरू झाले आहे. पोलिस गुन्हे दाखल करुन केवळ तपास चालू असल्याचे सांगत आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. या परिस्थितीमुळे राहुरी तालुक्यातील जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, राहुरीत मोठ्या प्रमाणावर चोऱ्या, दरोडे पडत आहेत. तसेच दुचाकी, मोबाईल चोरांचे देखील प्रमाण वाढले आहे. पूर्वी व्यापारी पेठेत दिवसा पोलिस प्रशासनाकडून पोलिस वाहन फिरविले जात असे, पोलिस वाहनाच्या गस्ती मुळे दिवसा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणारे, पाकीटमार तसेच छोटे मोठे चोरांचा व्यापारी पेठेतील उपद्रव बंद झाला होता. सध्यास्थितीत छोट्या मोठ्या चोरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तसेच राहुरी शहरातील अस्तव्यस्त वाहन धारकांना तारखे नुसार नियमावली करावी. वेळीच आपण झालेल्या चोऱ्यांचा तपास तात्काळ करावा व भविष्यकाळात चोऱ्या होणार नाहीत याच्यासाठी तात्काळ उपाय योजना कराव्यात. भविष्यकाळात चोऱ्यांचे सत्र न थांबल्यास व्यापारी असोसिएशनच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.
बाजारपेठेतील सर्वांनी मिळून जर वाॅचमन नेमला व cctv कॅमेरे लावल्यास गुन्ह्यास प्रतिबंध होऊ शकतो असे सांगितले होते. पोलिस वाहन देखील बाजारपेठेत फिरतील, असे निवेदन देण्यास आलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे पो नि राजेंद्र इंगळे यांनी सांगितले
यावेळी व्यापारी असो.चे अध्यक्ष प्रकाश पारख, नंदुशेठ भट्टड, देवेंद्र लांबे, अनिल भट्टड, संतोष लोढा, गौरव झवर, जसविंदरसिंह कथुरिया, किशोर सोनवणे, सुनिल धोंडे, अभय कालिया, जगन्नाथ रकटे, विनय दरक, प्रशांत चुत्तर आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी पो.नि.राजेंद्र इंगळे यांच्या उर्मठ वर्तुणुकीचा याप्रसंगी निषेध नोंदविला...निवेदन देण्यासाठी ज्यावेळी व्यापारी असोसिएशन सदस्य पो.नि. यांच्याकडे गेले, त्यावेळी अध्यक्ष प्रकाश पारख यांनी वाढलेल्या चोऱ्या, पूर्वी पोलिस वाहन व्यापारी पेठेत दिवस रात्री गस्त घालत असे. परंतु सध्या सर्व गस्ती बंद असल्या विषयी चर्चा केली असता पो.नि. इंगळे यांनी तुम्ही प्रत्येक पेठेतील दुकानदारांनी रात्रीचे रखवालदार नेमा, CC TV क्यामेरे बसवा, व्यापाऱ्यांनी दक्षता पाळा असा उलट सल्ला दिल्यामुळे व निवेदनावर कुठल्याही प्रकारे सकारात्मक उत्तर न दिल्याने व्यापारी असोसिएशने पोलिस ठाण्यातच पो.नि. इंगळे यांच्या उर्मठ वागण्याचा निषेध नोंदविला आहे. राहुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने पो.महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे पो.नि. राजेंद्र इंगळे यांची तक्रार करणार आहेत.
0 टिप्पण्या