राहुरी शहर/अशोक मंडलिक : दुर्गम व आदिवासी भागातील जि .प शाळा कळवंतनीचीवाडी (वावरत) केंद्र सडे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे गुरुवार दि. 9 डिसेंबर 2021 रोजी भव्य शैक्षणिक उठाव व साहित्य वाटप कार्यक्रम मानवता सहयोग प्रतिष्ठान (दिल्ली) व निर फाऊंडेशन पारनेर कै.रिना दास यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री निर्मल दास गुरुजी व त्यांची सुकन्या कु. अशिता दास (दिल्ली) व अनेक राज्यातील त्यांचे सहकारी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब सोडनर, जांभळी चे सरपंच रामदास बाचकर, उपसभापती प्रदीप पवार, गावचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, उपसरपंच रावसाहेब केदार, तसेच गटशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, विस्तार आधिकारी अर्जुन गारुडकर, केंद्रप्रमुख रवींद्र थोरात, जांभळी शाळेचे मुख्याध्यापक देवराम जाधव, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके व मित्रपरिवार उपस्थित होते.
सदर संस्थेने या आदर्श शाळेसाठी दीड लाख रुपयांचा निधी खर्च करून शाळेचे रंगकाम बोलक्या भिंती तयार करून एक आगळीवेगळी आदर्श शाळा निर्माण केली. तसेच निर फाऊंडेशन कडून सर्वांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. मान्यवरांना शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब दुंडे, उपाध्यापक प्रभाकर खरमाळे यांनी शाळेची पीपीटी दाखवली. पीपीटी पाहून सर्वांनी शाळेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच ज्ञानेश्वर बाचकर यांनी केले. सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते मुलांना दप्तर, वह्या, पेन तसेच ग्रामस्थांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. तसेच पेंटर रमेश कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
या आदर्श शाळेतील दोन्ही शिक्षकांचा सर्वांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेचे कौतुक केले. जि. प. सदस्य धनराज गाडे यांनी एल ई डी खरेदी साठी अकरा हजार रुपये, उपसभापती यांनी पाच हजार रुपये, रावसाहेब केदार यांनी लेखन साहित्य तसेच ठाकरवाडी (आळे) शाळेचे मुख्याध्यापक विकास दावभट व जांभळी शाळेचे मुख्याध्यापक देवराम जाधव यांनी सुद्धा मुलांना शैक्षणिक साहित्य दिले. सभापती सौ बेबीताई सोडनर यांनी शाळेसाठी हँडवॉश स्टेशन, एल.इ.डी. लाईट दिली. ज्ञानेश्वर बाचकर यांनी सर्व मुलांसाठी स्पोर्ट ड्रेस व शाळेसाठी एक लाख रुपयांचे प्लेव्हिंग ब्लॉक देण्याचे जाहीर आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करणे कामी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपीनाथ दुधवडे व गंगाराम दुधवडे यांनी परिश्रम घेतले. शाळेला दहा गुंठे जागा दिल्याबद्दल मिलिंद दुधवडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सूर्यकांत काळे, सुंबे, तांबोळी, खाडे, जयवंत ठाणगे, हिम्मत चेमटे, विशाल खरमाळे, कदम, कोरडे, काळे, डोईफोडे, वैशाली खरमाळे, उमाप, सालके, नरवडे, आप्पासाहेब बाचकर, सखाराम जाधव. ग्रामसेवक चंद भाऊसाहेब जाधव, अविनाश बाचकर, निर फाऊंडेशनचे प्रमोद पवार, रमेश सिंग, रमेश औटी, तसेच महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. अनिल शिंदे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. या शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब दुंडे यांनी सर्वांचे आभार मानून शाळेची गुणवत्ता वाढीसाठी पालकांनी सहकार्य करावे असे मत व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या