राहुरी शहर/अशोक मंडलिक : वंचित बहुजन आघाडीचे नेते आ. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी विधानभवनावर काढलेल्या मोर्चाला राहुरी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदन म्हटले की, केंद्रातील सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र लिहून दिले कि, मोदी सरकार ओबिसींची जनगणना करणार नाही व राज्य सरकारला इम्परीकल डाटा हि देणार नाही. सुप्रीम कोर्टाने ओबीसींना आरक्षण देण्यासाठी ओबीसी जनगणनेचा डेटा मागितला आहे. हा डेटा देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार टाळा-टाळ करीत आहे. म्हणून आज दि-२३ डिसेंबर २०२१ रोजी ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहेे. त्याला राहुरी तालुका वंचित बहुजन आघाडी व समविचारी संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात येत आहे. तरी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ओबीसींना लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष अनिल जाधव, युवा जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, शहाराध्यक्ष पिंटूनाना साळवे, सरपंच डॉ जालिंदर घिगे, बापुराव धसाळ, बाबुराव मकासरे, सागर देशमुख, संरपच बाबासाहेब शिंदे, व अंसख्य कार्यकते उपस्थित होते.
0 टिप्पण्या